Ad will apear here
Next
पीडितांचे ‘बाबा’


आधुनिक भारताचे संत, साक्षात करुणामूर्ती, समाजसेवक बाबा आमटे यांचा आज (२६ डिसेंबर) जन्मदिन! कुष्ठरोग निवारणापासून ‘भारत जोडो’ आंदोलनापर्यंत विविध आघाड्यांवर अविरत कार्य करणाऱ्या या खऱ्या कर्मयोग्याला शतश: वंदन!

बाबांचे सारे जीवन विविध नाट्यांनी सजलेले होते. त्यांचे पाळण्यातील नाव मुरलीधर. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात १९१४मध्ये झाला. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसिंग कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. आपण स्वतः डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले.

त्यांनी काही काळ वकिलीही केली. याच काळात सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९४३मध्ये वंदे मातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.



स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारतभ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

त्या काळात तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली.

१९५२ साली वरोऱ्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८पर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. नऊ फेब्रुवारी २००८ रोजी वरोरा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

असे बाबा आमटे. त्यांच्या बरोबरीनेच त्यांच्या पत्नी साधनाताई या सेवाकार्यात उतरल्या होत्या. पुढे त्यांचे दोन्ही पुत्र - विकास व प्रकाश हे दोघेही सहकुटुंब बाबांच्या कार्यात आले. त्यांची मुले अनिकेत, कौस्तुभ व शीतल हेही याच सेवाकार्यात आले.

समाजसेवेसाठी सर्वस्व झोकून देणारी आमटेंची ही तिसरी पिढी. असे उदाहरण विरळाच.



बाबा गेल्यानंतरही त्यांचे कार्य अविरतपणे चालूच राहिले, याचे एक कारण त्यांच्या कुटुंबाची विस्मयकारक भावनिक गुंफण; पण अलीकडेच त्यांची नात डॉ. शीतल यांनी आपले जीवन संपवले. या परिवारात असे का व्हावे, हे एक कोडेच आहे. देशांतील पीडितांना आशेचा किरण दाखवून जगण्याची उमेद देणाऱ्या बाबांच्या लाडक्या नातीला मात्र ते वाचवू शकले नाहीत. ही नियतीचीच अजब लीला.

बाबांची प्रतिभा अफाट. त्यांचे ‘ज्वाला आणि फुले’ व ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे कवितासंग्रह त्यांच्या दुर्दम्य आशावादाचे व प्रतिभेचे दर्शन घडवतात.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती, 
तेथे कर माझे जुळती 

बाबांना प्रणाम!

- भारतकुमार राऊत

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UVJOCT
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language